दौलत नगरातील बंद घरातुन चोरट्यांनी ९० हजारांचा ऐवज लांबवीला.

 



जळगाव शहरात दौलत नगर भागातील बंद घरातून चोरट्यांनी ९० हजारांचा ऐवज लांबविल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली आहे. या प्रकरणी गुरुवारी दुपारी २ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



अधिक माहिती अशी की, संतोष भाऊलाल नेटके रा. दौलतनगर जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. संतोष भाऊलाल हे जळगाव तालुक्यातील पाथरीचे आहे.

मात्र मुलांच्या शिक्षणासाठी ते जळगावात राहतात. मंगळवारी ते आपली पत्नी सोनी नेटके व मुलगी भूमिका यांच्यासह पाथरी येथे गेले. तर मुलगा व साळूची मुलगी हे नाशिकला गेल्यामुळे दोन दिवसापासून घर बंद होते. बंदर असल्याची संधी साधून चोरट्यांनी बुधवारी रात्री घर फोडून घरातून प्रवेश केला आणि घरातून ४७ हजार ५०० रुपयांची रोकड आणि ५ ग्रॅम व ४ ग्रॅम वजनाच्या ४० हजार किंमतीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या व एक ३ हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरट्यांनी लांबविला आहे. दरम्यान गुरुवारी २२ जीवन सकाळी नळ आल्यानंतर नेटके यांच्या घरातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते.


त्यामुळे शेजारील रहिवाशी विजय नथू कोल्हे यांनी घरात विचारले असता घरातून ते गावाला गेले असल्याची कळवले. मात्र नक्की यांचे घर उघडेच असल्याने त्यांच्या घरात चोरी झाल्याचे कोल्हे यांच्या लक्षात आले. त्यानंतर कोल्हे यांनी नेटके यांना याबाबतची माहिती दिली नेटके यांनी घरी येऊन याबाबतची माहिती पोलिसांना दिली. रामानंदनगर पोलीस ठाण्याचे संजय सपकाळे, व सुशील चौधरी, या दोघांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर संतोष नेटके यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.