महिला डॉक्टरचा विनयभंग एका विरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा.

 



शहरातील सद्गुरू नगर परिसरातील दवाखान्यात गर्दीचा गैरफायदा घेत 47 वर्षीय महिला डॉक्टरला वारंवार स्पर्श करून तिचा विनयभंग करणाऱ्या एका जनाविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



 याबाबत महिलेच्या फिर्यादीनुसार  16 जून रोजी सायंकाळी दवाखान्यात गर्दी होती. त्या गर्दीचा गैरफायदा घेत सद्गुरु नगर मधील रहिवासी असलेला इसम महिला डॉक्टरला वारंवार स्पर्श करीत होता. त्यामुळे ती महिला डॉक्टर वैतागली व त्यांनी 22 जून रोजी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठले महिलेच्या फिर्यादीनुसार संबंधित इसमाविरुद्ध विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.हे.कॉ. विजय पाटील हे करीत आहेत.