शहरातील सरदार सरदार वल्लभभाई पटेल भवन येथे पेंटर एकता असोसिएशनतर्फे पेंटर बांधवांच्या पाल्यांना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम रविवारी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाच्या सुरवातीला विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केल्यानंतर महापौर जयश्रीताई महाजन सहाय्यक पोलीस अधीक्षक आप्पासाहेब पवार रूपरंग पॅलेस चे संचालक फारुख शेख यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी ३०० च्या वर विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी अधिकारी,डॉक्टर, इंजिनियर कस होता येईल हे ध्येय समोर ठेवावे- स. पो.उपअधीक्षक आप्पासाहेब पवार.
आपले पालक आपल्यासाठी करीत असलेल्या कष्टाची जाणीव ठेवून अधिकारी, डॉक्टर, इंजिनियर कस होता येईल हे ध्येय विद्यार्थ्यांनी समोर ठेवले पाहिजे. असे मोलाचे मार्गदर्शन स. पोलीस उपअधीक्षक आप्पासाहेब पवार यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले.
हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून मोठ झाल्यावर आपण देखील गरजू विद्यार्थ्यांना मदत केली पाहिजे- महापौर जयश्रीताई महाजन.
आपण शिक्षण घेत असतांना आपणास मदत करणाऱ्या लोकांचा हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून मोठ झाल्यावर आपण देखील गरजू विद्यार्थ्यांना मदत केली पाहिजे असे मत महापौर जयश्रीताई महाजन.
यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पेंटर एकता असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष गजराज पवार, जिल्हा उपाध्यक्ष श्रीकृष्णा सपकाळेे, सचिव आसिफ सय्यद, सहसचिव मंगल सिंग जाधव, खजिनदार जितेंद्र सहानी यांच्यासह पेंटर एकता असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले



Social Plugin