स्वराज्य जननी प्रतिष्ठान व, अश्विनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वराज्य जननी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मोहित येवले यांच्या माध्यमातून आज १४ ऑगस्ट २०२३ रोजी नशिराबाद येथील भवानीनगर भवानी माता मंदिर येथे मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबिरा प्रसंगी उपस्थित तज्ञ डॉ. रागिनी पाटील, डॉ.स्वप्निल चौधरी, डॉ. उमेश पाटील, डॉ. खुशाल जावळे, डॉ. वैभव पाटील,डॉ.अमोल पाटील, डॉ. आरुषी पाटील , डॉ. खुशी ठोंबरे व इतर सहाय्यक डॉक्टर्स यांनी रुग्णांची तपासणी करून आजाराविषयी आवर्जून चौकशी करित त्यांच्यावर उपचार केले. या शिबिराचा 150 रुग्णांनी लाभ घेतला. याप्रसंगी शिव सह्याद्री प्रतिष्ठान चे संस्थापक गणेश भाऊ चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती
यावेळी डॉ.रमेश येवले ,मुकुंदा रोटे,विनोद रंधे,सतीश सावळे, दीपक कोळी, प्रदीप साडी,संदीप माळी, विकास बिराडे,युराज सोनटके, आनंद रंधे, प्रदीप सुरवाडे,नितीन बेंडवल, विलास नाथ, मोहन माळी, योगेश कोलते , नरेंद्र धर्माधिकारी आदी उपस्थित होते.
दरम्यान गावात मोफत आरोग्य शिबीर घेतल्याने येथील नागरिकांनी स्वराज्य जननी प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानत कौतुक केले.


Social Plugin