शहरातील आकाशवाणी चौक येथे गॅस सिलेंडरनेे भरलेल्या ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी 11 वाजता  घडली पंजाबराव नामदेव बोरसे वय 53 रा.



कोल्हाडी ता. बोदवड असे मयताचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील सहकार विभागाची मंगळवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीसाठी पंजाबराव नामदेव बोरसे हे सकाळी बोदवड येथून दुचाकीने (क्र. एमएच १९, एसी 0224) ने जळगावला यायला निघाले. ते शहरातील आकाशवाणी चौकात पोहचले त्या वेळी तेथे मागून गॅस सिलिंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकने (क्र. एमएच ०४ जेयु ९५९६) त्यांना धडक दिली. यात बोरसे चाकाखाली आले व त्यांच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला. त्यामुळे ते जागीच गतप्राण झाले. मोठा आवाज झाल्याने नागरिकांनी तेथे धाव घेतली व पोलिसही तेथे पोहचले. त्यांनी रुग्णावाहिका मागवून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय  दाखल करण्यात आले आहे. घरातील कर्ता पुरूष गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान याप्रकरणी  रामानंदनगर  पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे