रात्री गस्तीवर असलेल्या धुळे तालुका पोलिसांनी पाठलाग करून शिथाफिने एका संशयीतास अटक केली असून दुसरा फरार होण्यास यशस्वी ठरला आहे. ताब्यातील संशयीताकडून गावठी पिस्टल दोन काडतूस दोन कटर आणी स्कार्पियो गाडी जप्त करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की सोमवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास धुळे तालुका पोलीस ठाण्याचे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक दीपक धनवटे, पोलीस नाईक, कुणाल पानपाटील, पोलीस नाईक उमेश पवार, पोलीस कॉ. विशाल पाटील, पोलीस कॉ. कुणाल शीगाने, पोलीस कॉ. धीरज सांगळे हे रात्री गस्तीवर असताना अक्कलपाडा धरणाच्या अलीकडे हॉटेल फौजी जवळील रोडच्या बाजूला, एका काळ्या रंगाच्या स्कार्पिओ गाडीमध्ये दोन तरुण संशयितरित्या दिसले. पोलिसांनी त्यांना हटकविण्याचा प्रयत्न केला , दोघ तरुण पोलीस गाडी पाहून त्यांच्या ताब्यातील एम.एच ०४ बी.डब्लू. ८५०७ स्कार्पिओ गाडी घेऊन धुळ्याकडे सुसाट वेगाने पळाले. पोलिसांनी वाहनाचा पाठलाग करत अतिशय शिताफीने मोराणे गाव शिवारातील वार गाव फाट्याजवळ गाडी अडवली. मात्र दोघ संशयित हे अंधाराचा फायदा घेत पळून जाण्याच्या प्रयत्न करीत असतांना त्यातील एकास पोलिसांनी मोठ्या शितापीने ताब्यात घेतले. दुसरा मात्र फरार होण्यास यशस्वी ठरला. ताब्यातील संशयीताची विचारपूस केली असता, त्याने त्याचे नाव तोहिदखान फिरोजखान वय २२ वर्ष रा. मोमीनपुरा तालुका मालेगाव जिल्हा नाशिक असे सांगितले. त्याची अंग झडती घेतली असता, त्याच्या कमरेत एक गावठी पिस्टल व खिशात दोन काडतूस, दोन कटर आढळून आले. याप्रकरणी धुळे तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार संशयीताचा पोलीस शोध घेत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक संजयजी बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी धुळे ग्रामीण विभाग साक्री साजन सोनवणे, पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील, यांचे मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलीस स्टेशनचे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक दीपक धनवटे पो.हे.कॉ. नितीन चव्हाण पो.हे.कॉ. किशोर खैरनार पोलीस नाईक कुणाल पानपाटील, पोलीस नाईक उमेश पवार, पो.कॉ. विशाल पाटील पो.कॉ. कुणाल शिगाणे, पो.कॉ.धीरज सांगळे, पो.कॉ. राकेश मोरे, पो.कॉ. रवींद्र सोनवणे, पो.कॉ. कांतीलाल शिरसाठ, पो.कॉ. नितीन दिवसरे, पो.कॉ. प्रमोद पाटील व पो.कॉ. अमोल कापसे यांनी केली आहे.
दरम्यान धुळे पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाई मुळे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.


Social Plugin