अनिल अडकमोल यांची रिपब्लिकन सेनेच्या जिल्हाध्यक्ष पदी नुकतीच निवड करण्यात आली असून, ही निवड राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशावरून राष्ट्रीय उपाध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश प्रभारी काकासाहेब खबाळकर यांनी केली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटात असतांना अनिल अडकमोल यांनी जन हितासाठी वेगवेगळी आंदोलन करून प्रशासनाचे नेहमीच लक्ष वेधले आहे. जळगाव जिल्ह्यात त्यांना मानणारा मोठा गट असून याचा पक्ष संघटना वाढीसाठी मोठा फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे. निवडीनंतर त्यांचे सहकारी प्रताप बनसोडे, अनिल लोंढे, किरण अडकमोल, सचिन अडकमोल, यांनी त्यांचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.


Social Plugin