रेल्वे स्थानक येथिल डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे सुशोभीकरण करा- ३५८ ग्रुपतर्फे महापौर यांना निवेदन

 


जळगाव रेल्वे स्थानक येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे सुशोभीकरण लवकरात लवकर करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन आज  21 ऑगस्ट  रोजी ३५८ ग्रुपच्या वतीने  महापौर जयश्री ताई महाजन यांना देण्यात आले. स्मारकाचे सुशोभीकरण लवकरात लवकर न केल्यास समाज बांधवांतर्फे  आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी निवेदनातून देण्यात आला. दरम्यान महापौर जयश्रीताई महाजन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे लवकरात लवकर सुशोभीकरण करण्यात सुरुवात होईल असे आश्वासन दिले.यावेळी  358 ग्रूपचे संस्थापक अध्यक्ष अजय गरुड, अध्यक्ष पंकज  सोनवणे, उपाध्यक्ष गणेश पगारे, सचिव सोनू  शिरसाट, उपसचीव नितीन अहिरे, शांताराम अहिरे, भूषण साळुंखे, शंभु सपकाळे यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.