जामनेर येथील एका दुकानाची रखवाली करणा-या वाचमनला चोरी करण्यासाठी आलेल्या चोरांनी मारहाण करून जखमी केले होते वाचमनचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अरुण आत्माराम सैतवाल वय ६५ रा. शास्त्री नगर जामनेर असे मयताचे नाव आहे.
मिळालेल्या माहिती नुसार
अरुण आत्माराम सैतवाल हे जामनेर येथील भंगार दुकानावर वाचमनचे काम करत होते. 11 ऑगस्टच्या भल्या पहाटे तिन वाजेच्या सुमारास ते झोपेत असतांना काही चोर त्याठिकाणी आले. आलेल्या चोरांनी त्यांना मारहाण केली. या मारहाणीत ते जखमी झाले. मारहाणीनंतर चोर पळून गेले. जखमी झालेल्या अरुण सैतवाल यांना उपचारार्थ गोदावरी हॉस्पीटल जळगाव खुर्द येथे दाखल करण्यात आले. 19 ऑगस्ट रोजी सायंकाळी ते मयत झाले. या मृत्यूप्रकरणी जामनेर पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस उप निरीक्षक दिपक मोहिते करत आहेत.


Social Plugin