समाजिक कार्यकर्ते सतीश गायकवाड यांची मांगणी.
जळगाव रेल्वे स्थानकावरील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात नियमितपणे साफ सफाई केली जात नसून, या ठिकाणी असलेल्या कारंज्या देखील बंद आहेत. तसेच याठिकाणी नियमितपणे महापालिकेचा कर्मचारी कर्तव्यावर असणे आवश्यक असतांना देखील कर्मचारी नियमित नसतो. वारंवार तक्रारी करून सुद्धा प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याची माहिती परिवर्तन ग्रुपचे अध्यक्ष समाजिक कार्यकर्ते सतीश गायकवाड यांनी दिली आहे. ११ ऑक्टोबर २०२३ रोजी या संदर्भात सतीश गायकवाड यांनी महापलिकेच्या अधिकारी यांच्याशी संपर्क साधत याबाबत तक्रार केली होती. यावेळी लगेच आरोग्य विभागाचे कर्मचारी यांनी साफसफाईला सुरवात केली. काल सफाईचा एक टप्पा पूर्ण करणात आला असून आज दुसरा टप्पा पूर्ण करण्यात येणार आहे. मात्र महापालिकेने याकडे लक्ष देऊन या ठिकाणी नियमितपणे स्वछता ठेवून एक कर्मचारी कर्तव्यावर ठेवावा असे देखील सतीश गायकवाड यांनी यावेळी बोलताना सांगितले.


Social Plugin