१५ नोव्हेंबर रोजी येवला येथून येवला मुक्त भूमी ते दादर चैत्यभूमी येथे समाज जोडो यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेचे आयोजन कट्टर भीम सैनिक प्रदीप थोरात यांनी केले आहे. या समाज जोडो यात्रेचा जास्तीत जास्त प्रचार व प्रसार व्हावा म्हणून जळगाव येथील कट्टर भीमसैनिक विकास भालेराव यांनी आज सकाळी पायी यात्रेला सुरुवात केली आहे. या यात्रेत बौद्ध समाज बांधवानी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे देखील आवाहन भालेराव यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे. भालेराव यांनी आज भडगाव पर्यंत प्रवास केला असून आज ते भडगाव तालुक्यातील पाथर्डी गावात मुक्कामी राहतील व सकाळी पुन्हा पायी यात्रेला सुरुवात करतील अशी माहिती त्यांनी दिली आहे.

Social Plugin