गिरणा नदीवर समांतर पूला सह बंधारा बांधण्यासाठी - कृती समितीची स्थापना

 


अजिंठा शासकीय विश्रागृह येथे रविवारी एका अत्यंत महत्वाच्या विषया साठी तातडीची सभा आयोजित करण्यात आली होती. त्यात जळगाव शहर लगत असलेल्या बांभोरी पुलाचे समांतर रस्ते सह बंधारा बांधण्याची प्रशासकीय मान्यता असताना सुद्धा फक्त पुलाचे बांधकामाचे टेंडर निघाल्याने त्यावर आवश्यक तो निधी वाढवून बंधारा सह पुलाचे बांधकाम व्हावे या साठी कृती समितीची स्थापना करण्यात आली. पूर्वीची समांतर रस्ते कृती समिती हीच बांभोरी पुल - बंधारा कृती समिती म्हणून कार्यरत आहे. 

सोमवारी देणार निवेदन

सार्वजनीक बांधकाम अधीक्षक अभियंता यांना २० नोव्हेंबर सोमवारी सकाळी ११ वाजता निवेदन देणार असून त्याच्या प्रती पालक मंत्री गुलाबराव पाटील,ग्राम विकास मंत्री गिरीश भाऊ महाजन,पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील, जिल्हा अधिकारी आयुष प्रसाद यांना सुद्धा देणार असल्याने कृती समिती सदस्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन समिती तर्फे फारुक शेख यांनी केले आहे

 यावेळी सरिता माळी - कोल्हे,डॉ राधेश्याम चौधरी,विष्णू भंगाळे,सुनील महाजन,जमील देशपांडे,विनोद देशमुख,अडव्होकेट राजेश झालटे, शिवराम पाटील,बंटी जोशी,आशुतोष पाटील,फारुक शेख आदी उपस्थित होते.