महाबळ परिसरातील संभाजी नगर रिक्षा स्टॉप जवळ असलेल्या विवेक कॉलनीतील बंद घरातून अज्ञात चोरट्यांनी साडे नऊ तोळे सोन्यासह ३० हजारांची रोकड लांबवल्याची घटना ४ नोव्हेंबर रोजी दुपारी उघडकीस आली. या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, महाबळ परिसरातील संभाजी नगर रिक्षा स्टॉप जवळ असलेल्या विवेक कॉलनीत पंडित तुळशीराम माळी हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. माळी हे मूळ पाथरी येथील रहिवाशी असून ते जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथे नोकरीला आहेत. पाथरी ग्रामपंचायतीची निवडणूक असल्याने ते कुटुंबीयांसह गावी गेले होते. शुक्रवार ३ नोव्हेंबर रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून साडे नऊ तोळे सोन्याचे दागीने व रोख रक्कम ३० हजार असा मुद्देमाल चोरून नेला. शनिवारी माळी यांच्या पत्नी घरी आल्या त्यावेळी घटना समोर आली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरु आहे.


Social Plugin