राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व आमदार एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना तातडीने मुंबईत आणण्यात येणार आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने या घटनेची गंभीर दाखल घेतली असून त्यांनी खडसे यांना मुंबईला आणण्यासाठी एअर अम्बुलन्सची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
माजी मंत्री, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेतील आमदार एकनाथ खडसे यांना दुपारच्या दरम्यान हृदयविकाराचा झटका आणला. जळगाव येथील रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. मात्र, पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईला हलविण्याचा निर्णय घेण्यात आला.
एकनाथ खडसे यांना मुंबईला हलविण्याची तयारी करण्यात येत होती. मात्र, तातडीने उपचार करण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला. मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने या घटनेची गंभीर दखल घेतली. त्यांनी प्रशासनाला खडसे यांच्यासाठी एअर अम्बुलन्सची व्यवस्था करण्याचा सूचना दिल्या. काही वेळातच खडसे यांना मुंबईत आणण्यात येईल आणि त्यांच्यावर पुढील उपचार करण्यात येतील.

Social Plugin