आरोग्याच्या विविध उपचार सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी मोदी सरकारच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या "आयुष्मान भारत" योजने अंतर्गत आज मा. ना. गिरीश महाजन यांनी आपल्या मतदारसंघातील पळासखेडा मिराचे येथे लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत गोल्डन कार्डचे वितरण केले. यावेळी ना. गिरीश महाजन यांनी उपस्थित सर्वांना दीपावली निमित्त उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या. यावेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Social Plugin