धुळे शहरातील देवपूर भागात असलेल्या सिद्धार्थ चौक परिसरातील सुशोभीकरण कामाचा आज माजी उपमहापौर नागसेन बोरसे यांच्या स्थानिक विकास निधी मधून कुदळ मारून भूमिपूजन करण्यात आले यावेळी विविध मान्यवरांसोबत परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धुळे शहरातील सिद्धार्थ मित्र मंडळाच्या वतीने माजी उपमहापौर असलेल्या नागसेन बोरसे यांच्याकडे सिद्धार्थ चौक परिसरातील सुशोभीकरण करण्याच्या संदर्भात मागणी करण्यात आली होती. त्यांनी सिद्धार्थ कॉलनीतील नागरिकांची ही मागणी लक्षात घेऊन तातडीने धुळे महानगरपालिका येथील त्यांच्या स्थानिक नगरसेवक विकास निधीमधून पाच लाख रुपये मंजूर करून घेत या सुशोभीकरण कामाच्या मंजुरी मिळवून घेतली होती.
सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने औचित्य साधत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करत आज सिद्धार्थ चौकातील सुशोभीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी उपमहापौर नागसेन बोरसे, माजी महापौर प्रतिभा चौधरी, ॲड. विशाल साळवे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाचे प्राचार्य बहिरम सर, विधी महाविद्यालयाचे शशिकांत पाटील, भास्कर शिंदे, पंकज नेतकर, इंजिनियर अविनाश थोरात, विवेक नेतकर, सिद्धार्थ वाघ, रावसाहेब विक्रांत साळवे, विशाल मोरे, प्रीतम रामोशी, विशाल परोळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या कामाचा शुभारंभ करण्यात आला.


Social Plugin