व्हाईस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेच्या माध्यमातून धुळे शहरासह जिल्हाभरात पत्रकार दिन जोमात साजरा झाला आहे. जिल्ह्यातील शिरपूर, शिंदखेडा आणि साक्री तालुक्यासह शिरपूर शहरामध्ये पत्रकार दिनाचे औचित्य साधत "व्हाईस ऑफ मीडिया" पत्रकार संघटनेच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचबरोबर धुळे शहरात "व्हाईस ऑफ मीडिया" या पत्रकार संघटनेच्या धुळे शहर नवनियुक्त कार्यकारणीच्या पदाधिकारी व सदस्यांना आज "व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेचे" जिल्हाध्यक्ष भूषण अहिरे यांच्या उपस्थितीत धुळे जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारितेचा विश्वास दृढ करण्यासाठी नवनियुक्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांना नियुक्तीपत्र देताना अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी संघटने कडून राबविल्या जात असलेल्या उपक्रमांचे कौतुक देखील केले आहे. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या हस्ते व्हाईस ऑफ इंडिया पत्रकार संघटनेच्या धुळे शहर कमिटी मध्ये नव्याने सामील झालेल्या धुळे शहराध्यक्ष सोपान देसले धुळे शहर कार्याध्यक्ष अजीम शेख, धुळे शहर उपाध्यक्ष भास्कर फुलपगारे, धुळे शहर सरचिटणीस पदी धनंजय गाळणकर, धुळे शहर कार्यवाहक मनोज चौधरी, धुळे शहर सदस्य रामकृष्ण मिस्तरी, निसार अहमद अब्दुल जलील, संतोष दोरकर, सिद्धार्थ मोरे, छोटुलाल मोरे, राजेंद्र देवरे, जॉनी पवार, पुनम चंद्रकांत बेडसे, अभिजीत राजेंद्र मोहिते यांना धुळे शहर सदस्य नियुक्तीपत्र देऊन सन्मानित केले आहे.


Social Plugin