फिरदोसनगरमध्ये वॉल कंपाऊंडच्या कामाचा शुभारंभ आ.फारुख शाह यांचे हस्ते संपन्न

 






महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांचा विकास योजना अंतर्गत प्र. क्र.१३ फिरदोस नगर स.न.३७९/२ फा. प्लॉट ६६ खुल्या जागेस वॉल कंपाऊंड बांधणे.या २५ लक्ष खर्चाच्या कामाचा शुभारंभ आ.फारुख शाह यांचे शुभहस्ते संपन्न झाला.    

       धुळे शहरातील प्रमुख समस्या असलेल्या अनेक मूलभूत सुविधांच्या कामासाठी आ.फारुख शाह यांनी करोडो रुपयांच्या निधी नागरिकांच्या विकासासाठी आजपर्यंत आणलेला आहे शहरातील सुशोभीकरण असो पाणीची समस्या असो रस्त्याची समस्या असो गटारीची समस्या असो आणि कब्रस्तान असो तसेच अनेक वेगवेगळ्या विकास कामंसाठी आजपर्यंत आ.फारुख शाह यांनी निधी आणलेला असून शहराच्या विकासासाठी जे शक्य असेल ते सर्व करण्याचे प्रयत्न आ.फारुख शाह यांच्याकडून करण्यात येत आहे.शहरातील महानगरपालिकेच्या मालकीच्या खुल्या जागांवर बिनधास्तपणे अतिक्रमण केले जात आहे.पालिकेची तोकडी यंत्रणा अशाप्रकारच्या अतिक्रमणांना पायबंद घालण्यात सर्वस्वी अयशस्वी ठरत आहे.भविष्यात मुलांना खेळण्यासाठी खुल्या जागाच शिल्लक राहणार नाहीत.हा धोका ओळखून आ.फारुख शाह यांनी शहरातील ४० खुल्या जागांना वॉल कंपाऊंड करणे साठी जिल्हा वार्षिक योजनेतून २० कोटीचा निधी मागितला आहे.


फिरदोस नगर येथील स.न.३७९/२ फा. प्लॉट ६६ खुल्या जागेत यांच्या अलहाज अकलाख अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमास अलहाज अफ्फान अन्सारी,सलीम शाह,मौलवी शकील,ज्येष्ठ नेते साबीर शेठ,नगरसेवक नासिर पठाण,नगरसेवक मुक्तार अन्सारी,नगरसेवक सईद बेग,नगरसेवक आमिर पठाण, डॉ.दीपश्री नाईक,छोटू मच्छीवाले ,प्यारेलाल पिंजारी,इब्राहीम पठाण, युसुफ पापा सर,अर्शद पठाण,रशीद अन्सारी,इकबाल शाह,रेहान शेख, निजाम सय्यद,आसिफ शाह,सुफी हाजी,हारूण खाटीक,डॉ.बापुराव पवार,हालिम शमसुद्दिन,सलमान खान, नूरा पठाण, हाशिम अन्सारी,फैसल अन्सारी, स उ द आलम, आदी उपस्थित होते.कुराणातील आयातचे पठण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन  ईस्माइल सर यांनी केले तर आभार जाहिद  हुसेन यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चाहत अन्सारी मॅडम,सुफिया बी,इलियास सर,अमिज अहमद,लतिफ देशमुख,जफर अन्सारी,अशपाक खाटीक,आलिया गौहर मॅडम यांनी प्रयत्न केले.