भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्यावर गोळीबार, रुग्णालयात दाखल

 




भीम आर्मी या संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्यावर उत्तर प्रदेशातल्या सहारनपूर येथे जीवघेणा हल्ला झाला आहे. त्यांच्या फॉर्च्यूनर कारने ते देवबंद दौऱ्यावर निघाले होते. तेव्हा काही अज्ञातांनी त्यांच्या कारवर गोळीबार गेला. एक गोळी कारच्या दरवाजातून आरपार जाऊन आझाद जखमी झाले आहेत.आझाद यांना ताबडतोब देवबंद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.