आज दिनांक १ जुलै २०२३ रोजी हाती मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील येथील रहिवासी असलेले निवृत्त प्राथमिक शिक्षक संजय सुरवाडे यांचा मुलगा सुमेध संजय सुरवाडे यांची यूपीएससीच्या भारतीय वन सेवेमध्ये निवड झाली आहे. सुमेध हे देशामध्ये 137 रँकने यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाले असून यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.



 सुमेध सुरवाडे यांच्या परिवारात वडील संजय सुरवाडे हे निवृत्त प्राथमिक शिक्षक आहेत तर आई ह्या गृहिणी आहेत. तसेच जळगाव जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागात कार्यरत असलेले कॉन्स्टेबल रवींद्र जंजाळे यांचे ते भाचे असून यांचे देखील त्यांना वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले आहे.