जळगावच्या व्यापाराचा फेसबुकच्या माध्यमातून अश्लील व्हिडिओ बनवून व्हायरल करण्याची धमकी देत पावणे आठ लाख रुपये उकळले सायबर पोलिसात गुन्हा दाखल




 फेसबुक द्वारे सुरुवातीला महिलेने रिक्वेस्ट पाठवल्यानंतर व्यापाऱ्याने ती एक्सेप्ट करून चॅटींग सुरू केल्याने महिलेने अश्लील व्हिडिओ कॉल केल्यानंतर व्यापाऱ्यानेदेखील त्यास प्रतिसाद दिल्यानंतर आरोपींनी ती अश्लील चित्रफीत बनवली व त्या आधारे नंतर ब्लॅकमेल करीत जळगावच्या एका व्यवसायिकाकडून तब्बल सात लाख 77 हजार 777 रुपये उकळण्यात आले. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर व्यापाराने सायबर पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवल्यानंतर त्या महिला विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




याबाबत सविस्तर माहिती अशी की, 51 वर्षे पीडित व्यापाराच्या तक्रारीनुसार 16 ते 19 जून 2023 च्या दरम्यान त्यांच्या फेसबुकवर अनोळखी फेसबुक खातेधारक रिया अग्रवाल नामक महिलेने ओळख निर्माण केली. त्यानंतर मेसेंजरवर चॅटिंग व्हिडिओ करीत कामोद्विपक भावना उत्तेजित केल्या व तक्रारदाराचा नग्न व्हिडिओ तयार केला. त्यानंतर या अनोळखी महिलेने पैशाची मागणी सुरू करीत पैसे नदिल्यास हा नग्न व्हिडिओ युट्युब व सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत वेळोवेळी स्मॉल फायनान्स बँक व गुगल पे द्वारे सात लाख 77 हजार 745 रुपये उकडले. त्यानंतरही मागणी वाढत चालल्यानंतर व्यापाऱ्याने जळगाव सायबर पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.