तांबापुरा व फुकटपुरा येथील नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर मदत करा लोकशक्ति प्रतिष्ठानची मांगणी.




पावसामुळे शहरातील इच्छादेवी चौकातील तांबापुरा तसेच फुकटपुरा येथील घरांमधे पाणी घुसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर भरपाई मिळावी मांगनी लोकशक्ति प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हाधिकारी यांना करण्यात आली  . याबाबत सविस्तर माहिती अशी की, सोमवारी झालेल्या पावसामुळे शहरातील इच्छादेवी चौकातील तांबापुरा तसेच फुकटपुरा येथील घरांमधे पाणी घुसल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून प्रशासनाच्या वतिने पंचनामे करण्यात येत आहेत. 



काही घरांचे पंचनामे झाले असुन काही घराचे पंचनामे अजुन बाकी आहेत.  या भागात राहणारे सर्व बांधव मोल  मजुरी करणारे असून पावसामुळे झालेल्या या नुकसाणामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. दरम्यान या सर्व नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई मिळावी अशी  मांगणी  लोकशक्ति प्रतिष्ठानच्या वतीने शनिवारी करण्यात आली. यावेळी लोकशक्ति प्रतिष्ठानचे अध्यक्ष धारा ताई ठाकर,पराग कोचुरे, सोनू कडक यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.