सामाजिक कार्यकर्ते सचिन दादाराव अडकमोल यांचे चिरंजीव धम्मसार अडकमोल यांचा वाढदिवस १० ऑगस्ट रोजी मातोश्री वृद्धाश्रम येथे साजरा करण्यात आला.वाढदिवस हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय दिवस असतो धम्मसार हा १२ वर्षाचा असून त्याने इतक्या कमी वयात सामाजिक बांधिलकी जपत, आपल्या वडिलांना माझ्या वाढदिवस दिवशी वायफळ खर्च नकरता मातोश्री आश्रमात वाढदिवस साजरा करा असे सांगून लहान मोठ्या थोरांकडे एक आदर्श ठेवला आहे. धम्मसार यांच्या वाढदिवसानिमित्त सचिन दादा अडकमोल यांनी मातोश्री वृद्धाश्रम येथे वाढदिवस साजरा केला यावेळी सचिन भाऊ अडकमोल, राजू भाऊ साळुंखे, बबु भाऊ शिंदे, पिंटू कोळी, शाम पाटील, शाम शिंदे, दादा राठोड, वैभव दादा आदी उपस्थित होते


Social Plugin