शहरातील समता नगर येथील धामणगाववाडा परिसरात हातात कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या तरुणाला रामानंदनगर पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून लोखंडी कोयता हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंगळवारी ८ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,
जळगाव शहरातील समतानगर परिसरात असलेल्या धामणगाववाडा या परिसरात संशयित आरोपी राहुल नवल काकडे (वय-२३) रा. समता नगर, जळगाव हा हातात लोखंडी कोयता घेऊन धाक दाखवत, “मी या गल्लीचा दादा आहे, माझ्या नादी लागल तर या कोयताने मारून टाकेल” असे बोलून दहशत पसरवीत असल्याची माहिती रामानंदनगर पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने कारवाई करत संशयित आरोपी राहुल काकडे याला मंगळवारी ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी अटक केली. त्याच्याकडून लोखंडी कोयता हस्तगत केला आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई रवींद्र चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रात्री ९ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय सपकाळे, सुशील चौधरी, विजय खैरे, पोलीस नाईक, राजेश चव्हाण, विनोद सूर्यवंशी, रेवानंद साळुंखे, उमेश पवार, रवींद्र चौधरी, जुलालसिंग परदेशी यांनी केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक विजय खैरे करीत आहे.


Social Plugin