राष्ट्रवादीचे युवा नेते साहिल पटेल यांचा अजितदादा पवार गटात प्रवेश.



राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जळगाव युवा वरिष्ठ उपाध्यक्ष साहिल पटेल यांनी आपल्या सुमारे 60 ते 70 युवकांसह  नामदार अनिल दादा पाटील यांच्या उपस्थितीत अजितदादा पवार गटात जाहीर प्रवेश केला.  यावेळी त्यांच्यासोबत महानगर युवा आघाडीचे रफिक पटेल, अकील पटेल, यांच्या सह सुमारे 60 ते 70  कार्यकर्ते यांनी प्रवेश केला नामदार कॅबिनेट मंत्री अनिल पाटील यांनी साहिल पटेल व त्यांच्या समर्थकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करीत  पुढील राजकीय कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या. मुस्लिम समाजाचे असंख्य कार्यकर्ते जोडून पक्षाला मजबूत करण्या चे आश्वासन साहिल पटेल यांनी नामदार अनिल पाटील यांना दिले.   यावेळी रवींद्र नाना पाटील,  अभिषेक पाटील, वाय एस महाजन सर,अशोक पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.