जळगावातील ऍड. दीपक सोनवणे यांना संविधान रत्न पुरस्कार जाहीर.



1 ऑक्टोंबर रोजी वडगाव, मावळ येथे होणार पुरस्कार प्रदान.

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती पुणे, यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वकिलीचे शताब्दी वर्ष तसेच रमाई यांच्या १२५ व्या जयंती निमित्ताने भारतातील ८० वकिलांना संविधान रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.यात जळगाव येथील एडवोकेट दीपक सोनवणे यांना देखील हा  पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. दीपक सोनवणे यांनी  समाज्याच्या अनेक केसेस मोफत लढल्या असल्याने त्यांच्या याचं   सामाजिक कार्याची दखल घेत हा संविधान रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार सोहळा 1 ऑक्टोंबर 2023 रोजी सकाळी 10  ते सायंकाळी 6 या कालावधीत भेगडे लॉन्स, वडगाव, मावळ येथे संपन्न होणार आहे. दरम्यान दीपक सोनवणे यांना हा संविधान रत्न पुरस्कार जाहीर झाल्याने समाज बांधव तसेच मित्र परिवाराकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.