शिवसेना शिंदे गटाची कार्यकारणी जाहीर तालुका प्रमुखपदी शिवराज पाटील


 

शेतकरी संघटना तालुका प्रमुख पदी पी.के.पाटील यांची निवड.


शिवसेना शिंदे गटातर्फे जिल्हा आणि तालुक्यात संघटना मजबूत करण्याची जोरदार तयारी सुरु असून, शुक्रवारी मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार जिल्हाप्रमुख निलेश पाटील यांनी जळगाव   तालुक्याची कार्यकारिणी जाहीर केली. यामध्ये तालुका प्रमुखपदी शिवराज पाटील (धानवड) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर शेतकरी संघटना तालुका प्रमुख पदी पी.के.पाटील यांना जबाबदारी देण्यात आली आहे. 



१७ जणांच्या या कार्यकारिणीत प्रत्येक जि. प. गट व पंचायत समिती गणनिहाय पदाधिकाऱ्यांना संधी देण्यात आली असून, आगामी जि. प., पंचायत समितीच्या निवडणुकांकडे लक्ष देऊनच ही निवड करण्यात आल्याचे दिसून येते.


उपजिल्हा प्रमुखपदी अनिल बारसू भोळे, तालुका संघटक अनिल पाटील, तालुका समन्वयक जितेंद्र ताराचंद पाटील, ज्ञानेश्वर चव्हाण, तालुका सरचिटणीसपदी राजेंद्र पाटील, निलेश ठाकरे, उपतालुका प्रमुख प्रमोद सोनवणे, संदीप सुरडकर, प्रवीण परदेशी, महेश चौधरी, राजेंद्र पाटील, उपतालुका संघटक नितीन सपकाळे, शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष पी. के. पाटील, उपाध्यक्ष किशोर चौधरी, सचिन पाटील, ज्ञानेश्वर वसंत चौधरी यांचा समावेश आहे.