चरित्राचा संशयावरून पतीने पत्नीचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना चाळीसगाव तालुक्यातील तळोंदे दिगर येथे घडली. संशयित आरोपी पतीला मेहुणबारे पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, धुळे जिल्ह्यातील रोहिणीभोईटी येथील राजेश जगन पावरा (बारेला) (वय-२८) हा तरुण आपल्य पत्नीसोबत चाळीसगाव तालुक्यातील तळोंदा दिगर शिवारातील शेत गट क्रमांक ४५८ मध्ये वास्तव्याला होते. गेल्या अनेक दिवसांपासून पती-पत्नीमध्ये चरित्र्याच्या संशयावरून वाद सुरू होता. २५ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊ ते २६ सप्टेंबर सकाळी ६ वाजेच्या दरम्यान आरोपी राजेश जगन पावरा याने पत्नी शिवानी हिच्या चरित्रावर संशयावरून हातात मिरचीची पावडर घेऊन गुप्तांगात टाकून तिचा निर्घृन खून केला. हा प्रकार सकाळी उघडकीला आल्याने परिसरात खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मेहूणबारे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात मृतदेह हलविण्यात आला. पोलिसांनी संशयित आरोपी राजेश जगन पावरा याला अटक केले. याप्रकरणी रामेश्वर रूपचंद राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी राजेश जगन पावरा बारेला याच्या विरोधात मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णू आव्हाड करीत आहे.


Social Plugin