रामानंद नगर पोलिसांची मोठी कारवाई ३ अट्टल गुन्हेगारावर एमपीडीए.



कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले.


रामानंद नगर पो.स्टे हद्दीत राहणाऱ्या ३ अट्टल गुन्हेगारावर एमपीडीए ची कारवाई करण्यात आली असून या कारवाई मुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.  सचिन अभयसिंग चव्हाण वय २४ रा. गुरुदत्त कॉलनी पिंप्राळा, नितेश उर्फ गोल्या मिलिंद जाधव वय २४ रा. मढी चौक,पिंप्राळा, राहुल नवल काकडे वय २४ रा.समता नगर अशी स्थानबद्ध केलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. याबबत सविस्तर माहिती



 अशी की,रामानंद नगर पो.स्टे हद्दीतील् अट्टल गुन्हेगार सचिन अभयसिंग चव्हाण रा. गुरुदत्त कॉलनी पिंप्राळा,याच्यावर रामानंद नगर पोलीस स्टेशन तसेच इतर पोलीस स्टेशनमधे 07 गंभीर स्वरुपाचे गुन्हे जसे दरोडा टाकणे,मारामारी, गंभीर स्वरुपाची दुखापत करणे, अनधिकृत पणे घरात प्रवेश करून,मारहाण करुन खंडणी मागणे,खुनाचा प्रयत्न करणे, शस्त्र शस्त्र बाळगणे असेच यासारखे गंभीर गुन्हा दाखल आहेत तो नेहमी पिंप्राळा परिसरातील बुधवारच्या बाजारात सामान्य लोकांना धमकावून त्यांना मी या एरियाचा दादाा आहे असे सांगून प्रत्येकी २० रुपये हप्ता वसुली करीत असे.न दिल्यास मारहाण करीत असे. पोलिसांनी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून,देखील त्याच्या वर्तनात कोणताही प्रकारचा बदल होत नसल्याने त्याच्यावर आता स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. तसेच नितेश उर्फ गोल्या मिलिंद जाधव रा. मढी चौक,पिंप्राळा,रामानंद नगर पोलीस स्टेशनला तसेच इतर पोलीस स्टेशनला अनुक्रमे 13 गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असुन त्यात खुनाचा प्रयत्न करणे, सरकारी कामात अडथळा आणने, जबरी चोरी, घातक हत्यारासह दरोडा टाकणे, बेकायदेशीर जमाव जमवून दंगा करणे, अवैध दारूची विक्री करणे असे गुन्हे दाखल असुन त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून,देखील त्याच्या वर्तनात कोणताही प्रकारचा बदल होत नसल्याने त्याच्यावर आता स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे.

याच बरोबर रामानंद नगर पो.स्टे. हद्दीतील अट्टल गुन्हेगार राहुल नवल काकडे रा.समता नगर याच्यावर रामानंद नगर पोलीस स्टेशनला तसेच इतर पोलीस स्टेशनला अनुक्रमे 13 गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असुन त्यात खुनाचा प्रयत्न करणे, घातक हत्यारासह गंभीर दुखापत करणे, घरफोडी करणे, चोरी करणे, हद्दपार आदेशाचे उल्लंघन करणे, शस्त्र बाळगणे असे गुन्हे गुन्हे दाखल असुन त्याच्यावर २ वेळा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. राहुल हद्दपार करून देखील तो नेहमी तलवार, चाकु ,कोयता असे हत्यार बाळगुन समता नगर पररसरातील नागरीकांना हत्यारांचा धाक दाखवून मी या गल्लीचा दादा आहे. माझ्या नांदी लागाल तर, तुम्हाला ठार मारुन टाकेन अशा धमक्या देऊन दहशत निर्माण करीत असल्याने त्याच्यावर हि कारवाई करण्यात आली आहे.

रामानंदनगर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील मॅडम यांनी सदरचा प्रस्ताव तयार करून स्थानिक गुन्हे शाखेकडे सादर केला होता.  स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी प्रस्तावाचे अवलोकन करून तो जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला होता.  २९ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रस्तावावर शिक्का मोर्तब करून हे आदेश पारीत केले आहेत. दरम्यान  तिघांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

ही कारवाई करताना प्रामुख्याने पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील मॅडम पो.हे.कॉ. संजय सपकाळे, पो.हे.कॉ. सुशील चौधरी, पो.हे.कॉ.  सुनील दामोदरे स्था.गु.शा. पो.हे.कॉ.विजय खैरे पो.ना. राजेश चव्हाण,पो.ना. हेमंत कळसकर, रेवानंद साळुंखे, विनोद सूर्यवंशी, पो.कॉ. रवींद्र चौधरी, पो.कॉ. जुलालसिंग परदेशी, पो.कॉ. इरफान मलीक,  स्था.गु.शाखेचे ईश्वर पाटील या सर्वांनी स्थानबद्ध करण्यात आलेल्या धोकादायक व्यक्तीच्या विरुद्ध दाखल गुन्ह्यांच्या कागदपत्रांची पूर्तता करून तिघांना स्थानबद्ध करण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडली आहे.