सखाराम हिरोळे, मुक्ताईनगर यांना राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार प्रदान....



महाकवी वामनदादा कर्डक यांची 101 वी जयंती अकोला येथे दिनांक 31.8.2023 रोजी आयोजक आयुष्यमान पंकज खंडारे व उद्योजिका तथा सुप्रसिद्ध गायिका सौ रिता ताई पंकज खंडारे यांनी "न भूतो न भविष्यती " असा उत्सव घडवून आणला अशा ऐतिहासिक महाकवी वामनदादा कर्डक यांच्य 101 व्या सुवर्ण जयंती महोत्सवा मध्ये महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समिती अकोला यांचेकडून महाराष्ट्र तील प्रसिद्ध कवी गायक सखाराम हिरोळे, मुक्ताईनगर यांना मान्यवरांचे उपस्थितीत सन्मानपत्र व 5000 रुपये देऊन जीवन गौरवपु रस्काराने गौरविण्यात आले सदरचा राज्यस्तरीय पुरस्कार त्यांना मिळाल्यामुळे सर्व स्तरातील जनता कवी गायक सखाराम हिरोळे यांचे मनःपूर्वक अभिनंदन व कौतुक करीत आहेत.