राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज जळगाव जिल्हा दौरा असून शहरातील सागर पार्कवर दुपारी १:३० वाजता त्यांची जाहीर सभा होणार आहे. राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार यांची जळगाव जिल्ह्यात पहिलीच सभा होणार आहे. त्यामुळे शरद पवार आजच्या सभेत काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
असा असेल शरद पवार यांचा जिल्हा दौरा.
मुंबईहून सकाळी ९:५० वाजता जळगाव विमानतळावर पोहचतील तेथून १० वाजता जळगाव शहरात येण्यासाठी निघतील. १० : १५ ते १० : ३० दरम्यान मेहरूण येथे महापौर जयश्री महाजन यांच्या निवासस्थानी भेट देतील. त्यापुढील वेळ हा जैन हिल्स या ठिकाणी राखीव ठेवण्यात आला आहे.
दुपारी दीड ते साडेचार वाजेपर्यंत खासदार पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सागर पार्कवर सभा होईल. सभा संपल्यानंतर पाच वाजता ते जळगाव विमानतळावरून मुंबईसाठी रवाना होतील.


Social Plugin