राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार हे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांचे जळगाव येथे आगमन झाल्यानंतर सकाळी ९:३० वाजता महाबळ येथील रमेश पाटील यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट दिली. यावेळी समता नगर येथील समाजिक कार्यकर्ते राजेश साळुंखे यांनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.
असा असेल आ. रोहित पवार यांचा दौरा
सकाळी १० वाजता गुलाबराव देवकर कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग जळगाव येथे विद्यार्थी संवाद राष्ट्रवादी भवन येथे ११:४५ वाजता पत्रकार परिषद. १:३० वाजता मुक्ताईनगर येथे संत मुक्ताबाईचे दर्शन दुपारी २:०० वाजता आमदार एकनाथरावं खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमास उपस्थिती ३:०० वाजता रोहिणीताई खडसे यांचा सत्कार समारंभ ४:०० वाजता खडसे फार्म येथे मुक्ताईनगर, रावेर, बोडवड,भुसावलं, यावल तालूंका पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा. ५:०० वाजता जामनेर येथे जामनेर व पाचोरा तालुका पदाधिकारी बैठक. सायंकाळी ६:३० वाजता जळगाव येथे प्रमुख पदाधिकारी यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास उपस्थिती. ८:०० वाजता योगराज सपकाळे यांच्या निवासस्थानी भेट.

Social Plugin