ऍड. सुनील इंगळे यांना संविधान रत्न पुरस्कार जाहीर.




डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती पुणे यांच्या मार्फत 1 ऑक्टोंबरला होणार पुरस्कार प्रदान.

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती पुणे, यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वकिलीचे शताब्दी वर्ष पूर्ण होत असल्याने तसेच त्यागमूर्ती माता रमाई यांच्या १२५ व्या जयंती निमित्ताने वकील क्षेत्रात समाजिक बांधिलकी जपत  मोलाची कामगिरी करण्याऱ्या ८० वकील बांधवांना संविधान रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यात जळगाव येथील ऍड. सुनील सखाराम इंगळे यांना देखील हा  पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार सोहळा 1 ऑक्टोंबर 2023 रोजी सकाळी 10  ते सायंकाळी 6 या कालावधीत भेगडे लॉन्स, वडगाव, मावळ येथे संपन्न होणार आहे. दरम्यान ऍड. सुनील इंगळे यांना हा संविधान रत्न पुरस्कार जाहीर झाल्याने समाज बांधव तसेच मित्र परिवाराकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.