वंचित आघाडीच्या युवा जिल्हाध्यक्षपदी बाळा पवार यांची निवड

 




वंचित बहुजन आघाडीच्या युवा जिल्हाध्यक्ष पदी बाळा पवार यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. ही निवड वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये तसेच वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ.निलेश विश्वकर्मा, प्रदेश महासचिव राजेंद्रजी पातोडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. 

बाळा पवार वंचित बहुजन आघाडीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून सक्रिय असून त्यांनी समाज हितासाठी अनेक आंदोलन केली आहेत. तसेच त्यांच्या नियोजनाखाली फैजपूर येथे आद.प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत "राज्यस्तरीय आदिवासी हक्क परिषदेचे" आयोजन देखील करण्यात आले होते. परिषदेच्या यशस्वी आयोजनानंतर पक्षाकडून बाळा पवार यांची पुनश्चा युवा जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागली आहे.



या निवडीबद्दल बाळा पवार यांना जळगाव जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीच्या  युवा पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून शुभेच्छा दिल्या जात आहे.