समता नगर येथील नव दुर्गा मित्र मंडळाने साकारली बैल जोडीवर सप्तश्रुंगी मातेची मूर्ती.

 



समता नगर येथील हमाल वाडा येथील केदार फाउंडेशन संचलित  नव दुर्गा मित्र मंडळाने बैल गाडीवर सप्तश्रुंगी वणीगड येथे असलेल्या चितखडा येथिल सप्तश्रुंगी मातेची हुबेहूब आकर्षक मूर्ती साकारली आहे. देविच्या मूर्तीच्या दोन्ही बाजूस सिंह मुखातून पडणारे पाणी व बैल गाडीवर साकारलेली ही मूर्ती त्यात आदिमायेस नेसवलेले महावस्त्र, हे बघण्यासारखे आहेत. या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येत आहेत. ही मूर्ती चिनावल येथिल युवा मूर्तिकार भूषण वानखेडे यांनी तयार केली आहे. मंडळाकडून दांडिया  स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले असून पहिले बक्षीस फ्रिज,दुसरे  बक्षीस एलईडी टीव्ही लहान मुलांमध्ये सायकल रोख बक्षीस दिले जाणार असून वंचीत बहुजन आघाडी युवा जिल्हाध्यक्ष जितेंद्र भाऊ केदार वंचीत बहुजन आघाडी जळगाव महानगर अध्यक्ष ललित भाऊ घोगले यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखली हे सर्व आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष राहुल सुरवाडे यांनी दिली.