पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलाखाली धावत्या प्रवाशी रिक्षाने घेतला पेट अग्निशमन विभागाच्या पथकाने विझवली आग.

 


जळगाव शहरातील पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलाखाली  धावत्या प्रवाशी रिक्षाने पेट घेतल्याची घटना गुरूवारी १२ ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास घडली असून, महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या पथकाने धाव घेवून ही आग विझविली. तोपर्यंत प्रवाशी रिक्षा जळून खाक झाली होती. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी वाहनधारकांची तारांबळ उडाली होती.



जळगाव शहरातील पिंप्राळा येथील रेल्वे उड्डाणपुलाजवळून गेलेल्या रस्त्यावर गुरूवारी १२ ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास जळगावातून पिंप्राळा येथे जात असलेल्या रिक्षा क्रमांक (एमएच १९ व्ही ३४८८) ही प्रवाशी घेवून जात होती.  त्यावेळी अचानक रिक्षाने पेट घेतला. ही बाब रिक्षा चालकाच्या लक्षात आल्याने त्यांनी तातडीने रिक्षा रोडच्या बाजूला घेवून रिक्षा थांबविली. त्यानंतर क्षणातच रिक्षाने मोठा पेट घेतला.


यात संपुर्ण रिक्षा जळून खाक झाली आहे. ही आग कोणत्या कारणामुळे लागली यांची माहिती समोर आलेली नाही. दरम्यान काही वेळानंतर महापालिकेचे अग्निशमन विभागाचे पथकातील युसुफ पटेल, भारत बारी, रविंद्र बोरसे आणि तेजस जोशी यांनी बंबासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग विझविली. याबाबत पोलीसात नोंद घेण्याचे काम सुरू होते.