अजिंठा विश्राम गृह येथे युवा निर्मिती फाउंडेशनची स्थापना.

 अध्यक्ष पदी विवेक जावळे तर उपाध्यक्ष पदी मयूर अलकरी यांची निवड.

शहरातील अजिंठा शासकीय विश्राम गृह येथे युवा निर्मिती फाउंडेशनची स्थापना करण्यात आली. यावेळी मुंबई विधानपरिषद मा. आमदार रमेशदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली युवा निर्मिती फॉउंडेशनच्या अध्यक्ष पदी विवेक सुनील जावळे  उपाध्यक्ष पदी मयूर अलकरी, सचिवपदी ललित चौधरी, सहसचिव पदी स्वप्नील जावळे, खजिनदार म्हणून अनिकेत इंगळे, तर सभासद म्हणून निशांत साळुंके सभासद शर्वाय श्रावगे यांची निवड करण्यात आली.


युवा निर्मिती फॉउंडेशन मार्फत सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक. या क्षेत्रात कार्य केले जाणार असून गोर गरीबांचे व युवा. विद्यार्थ्यांच्या अडचणी व प्रश्न सोडवण्याचे काम युवा निर्मिती फॉउंडेशन मार्फत केले जाणार असल्याची माहिती मुंबई विधानपरिषद मा. आमदार रमेशदादा पाटील यांनी दिली. यावेळी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मा. मुकुंद सपकाळे, आमदार राजू मामा भोळे यांचे चिरंजीव विशाल भोळे,भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव अमित साळुंके, क्षितिज फॉउंडेशनचे अध्यक्ष गजानन वंजारी, स्वप्नील जावळे, सिद्धांत सपकाळे यांची उपस्थिती लाभली. दरम्यान विवेक जावळे व सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे, भीमसेना भीम आर्मी महाराष्ट्र प्रदेश नेते संजय सपकाळे यांनी पुढील वाटचालीस शुभेच्या दिल्या.