विटाभट्टी येथे अभ्यासिकेच्या कामाचा शुभारंभ आ.फारुख शाह यांचे हस्ते संपन्न



धुळे शहर महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांच्या विकास योजना अंतर्गत प्रभाग क्रमांक ३ देवपूर विटा भट्टी येथे अभ्यासिका बांधणे या कामांच्या शुभारंभ आज आ.फारुख शाह यांचे हस्ते करण्यात आला. धुळे शहरातील विद्यार्थ्यांना स्पर्धे परीक्षेत व इतर परीक्षांसाठी अभ्यास करण्यासाठी देवपूर भागात एक सुद्धा अभ्यासिका नव्हती आ.फारुख शाह यांच्या दूरदृष्टीमुळे देवपूर भागातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका व्हावे म्हणून त्यांच्या प्रयत्नाने अभ्यासिका साठी 25 लाख रुपये शासनाकडून मंजूर करण्यात आले धुळे शहरात विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अभ्यासिका नसल्यामुळे स्पर्धा परीक्षा व इतर परीक्षांसाठी गरुड वाचनालय येथे जावे लागायचे तेथे वेळे पत्रकाच्या बंधनानुसार व शहरातील लांब असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना फार अडचणीचे होते ही अडचण पाहता आमदार फारुकसान यांनी धुळे शहराच्या विविध भागात विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकास व वाचनालयाची आवड निर्माण व्हावी व स्पर्धा परीक्षा व इतर परीक्षांसाठी शहरातील विविध भागातील चार ठिकाणी अभ्यासिका मंजूर करून घेतले असून आज देवपूर भागातील दुसऱ्या अभ्यासिका चे कामाच्या शुभारंभ आमदार फारुक यांचे हस्ते करण्यात आला यामुळे विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून त्यांनी वदेपूर भागातील नागरिकांनी आ.फारुख शाह यांचे आभार मानले या कार्यक्रमाला देवपूर भागातील नगरसेवक नासिर पठाण,नगरसेवक सईद बेग,नगरसेवक गणी डॉलर,कैसर अहमद, डीसेंट मास्टर,डॉ. दिपश्री नाईक, फातेमा अन्सारी, महेमुना अन्सारी,निजाम सैय्यद,हलीम शमसुद्दिन,डॉ.बापुराव पवार,आसिफ शाह,अल्ताफ पिंजारी,सुफी हाजी,फकिरा बागवान,नजर पठाण, सउद आलम,अबरार शाह,जुबेर शेख, अकिब अली सैय्यद,शहजाद मन्सूरी,अब्दुल रहीम शेख,आरिफ खान,गबा मिस्तरी,रियाज शाह,मोईन खान,साजिद शेख,हबीब अन्सारी,जावेद मिर्झा,आसिफ शेख, नईम शेख,सलमान अन्सारी,सादिक पठाण,समीर शाह,एकलाक अन्सारी,फैसल अन्सारी, व प्रतिष्ठित नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते