वाढत्या गुन्हेगारीवर आळा घाल्यासाठी तसेच गुन्हेगारांवर वचक निर्माण व्हावा म्हणून रामानंद नगर पोलिसांनी ठोस पावले उचलली असून हद्दीतील अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून रामानंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सात ते आठ अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई करण्यात आलेली आहे. आता पुन्हा एका अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई करण्यात आली आहे. मयूर उर्फ विक्की अलोणे वय ३१ रा. जळगाव असे कारवाई करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव असून, या कारवाईमुळे गुन्हेगारी वर्तुळात वावरणाऱ्या गुन्हेगारांचे चांगलेच धाबे दनाणले आहेत.
याबबत सविस्तर माहिती अशी की,
रामानंद नगर पो.स्टे हद्दीतील अट्टल गुन्हेगार मयूर उर्फ विक्की अलोणे वय ३१ रा. जळगाव याच्यावर रामानंद नगर पोलीस स्टेशन, जळगाव शहर पोलीस स्टेशन, भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन, शनिपेठ पोलीस स्टेशन येथे ६ गंभीर स्वरुपाचे गुन्हे जसे की, खुनाचा प्रयत्न करणे, शस्त्र अधिनियमांचे उल्लंघन करणे, शस्त्रानीशी दरोडा घालणे, सार्वजनिक ठिकाणी जुगार खेळणे, लोकांना जुगार खेळण्यास प्रवृत्त करणे, गंभीर स्वरुपाची दुखापत करणे,अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी वेळोवेळी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून,देखील त्याच्या वर्तनात कोणताही प्रकारचा बदल झालेला नाही तो नेहमी पिंप्राळा परिसर तसेच जळगाव शहरातील कोणत्याही परिसरात सामान्य लोकांना धमकावून त्यांना शस्राचा धाक दाखवून पैसे वसुल करीत होता नकार दिल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन मारहाण करीत होता.
त्याच्यावर कायद्याचा वचक राहावा, त्याच्याकडून सामान्य लोकांच्या जिवतास व मालमत्तेस नुकसान होऊ नये या करिता रामानंदनगर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील मॅडम यांनी सदरचा प्रस्ताव तयार करून, अधीक्षक एम राजकुमार, सहायक पोलीस अधीक्षक संदिप गावित, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन व मदत घेऊन सदर इसम मयूर उर्फ विक्की अलोणे याला एमपीडीए कायद्या अंतर्गत कारवाई करून कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे.ही कारवाई करताना प्रामुख्याने पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील मॅडम पो.हे.कॉ. संजय सपकाळे, पो.हे.कॉ. सुशील चौधरी, पो.हे.कॉ. सुनील दामोदरे स्था.गु.शा. पो.ना. हेमंत कळसकर, रेवानंद साळुंखे, विनोद सूर्यवंशी, पो.कॉ. रवींद्र चौधरी, पो.कॉ. उमेश पवार, पो.कॉ. जुलालसिंग परदेशी, पो.कॉ. इरफान मलीक, पो.कॉ. किरण पाटील, स्था.गु.शा. पो.कॉ. ईश्वर पाटील या सर्वांनी स्थानबद्ध करण्यात आलेल्या धोकादायक व्यक्तीच्या विरुद्ध दाखल गुन्ह्यांच्या कागदपत्रांची पूर्तता करून स्थानबद्ध करण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडली. दरम्यान आदेश प्राप्त झाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक रोहिदास गभाले यांच्यासह पोलिस स्टाफ पाठवून मयूर उर्फ विक्की अलोणे याची कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

Social Plugin