डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वकिलीचे शताब्दी वर्ष तसेच माता रमाई यांच्या १२५ व्या जयंती निमित्त विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती पुणे, यांच्या वतीने भेगडे लॉन्स, वडगाव, मावळ येथे भारतातील ८० वकिलांना संविधान रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. यात जळगाव येथील ऍड. सुनील इंगळे यांना देखील हा पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे. ऍड. सुनील इंगळे यांच्या वकिली क्षेत्रातील सामाजिक कार्याची दखल घेत हा संविधान रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. दरम्यान ऍड. सुनील इंगळे यांना हा संविधान रत्न पुरस्कार प्रदान झाल्याने समाज बांधव तसेच मित्र परिवाराकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


Social Plugin