डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वकिलीचे शताब्दी वर्ष तसेच माता रमाई यांच्या १२५ व्या जयंती निमित्त विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती पुणे, यांच्या वतीने भेगडे लॉन्स, वडगाव, मावळ येथे भारतातील ८० वकिलांना संविधान रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. यात जळगाव येथील एडवोकेट दीपक सोनवणे यांना देखील हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. दीपक सोनवणे यांनी समाज्याच्या अनेक केसेस मोफत लढल्या असल्याने त्यांच्या याचं सामाजिक कार्याची दखल घेत हा संविधान रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. याचं बरोबर प्रमुख पाहुणे म्हणून ॲड प्रशांत बाविस्कर यांना सुध्दा यावेळी सन्मानित करण्यात आले. एडवोकेट दीपक सोनवणे हे जळगावातील प्रसिद्ध वकील अजय कुमार सिसोदिया यांचे ज्युनिअर असून त्यांचे नेहमी त्यांना मार्गदर्शन लाभत असते. दरम्यान दीपक सोनवणे यांना हा संविधान रत्न पुरस्कार प्रदान झाल्याने समाज बांधव तसेच मित्र परिवाराकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


Social Plugin