डेंग्यूवर आळा घालण्यासाठी नगरसेविका सुरेखा तायडे यांनी केली समता नगर परिसरात धुर फवारणी.




सध्या डेंग्यू, मलेरिया ची साथ सुरु असून व्हायरल आजारांचे प्रमाण वाढलेले आहे. दिवसेंदिवस डेंग्यूच्या रुग्णामध्ये मध्ये वाढ होत असून डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. दाट लोकवस्तीत हे डास मोठ्या प्रमाणात आढळतात त्यामुळे डासांच्या नियंत्रणाकरिता मनपाच्या आरोग्य विभागाने पाउले उचलत मशीनच्या माध्यमातून शहरात धुरळणी सुरु केली आहे. 



त्या अनुषगाने नगरसेविका सौ. सुरेखा नितीन तायडे यांनी वार्ड क्र. १३ मधील दाट वस्ती असलेल्या समता नगर परिसरात यांत्रिक मशीनच्या माध्यमातून धुरळणी केली. या धुरळणीमुळे डासांच्या उत्पत्तीवर नियंत्रण येते. त्यामुळे डासांची उत्पत्ती कमी होऊन रोगराई नियंत्रित करण्यासाठी मोठी मदत शक्य आहे. फवारणी करते वेळी नगरसेविका सौ. सुरेखा नितीन  तायडे यांच्या समवेत भूपेंद्र कुलकर्णी, संजय तिरमले,  मंगेश वाघ, दादा कोळी यांच्या सह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.