राष्ट्रवादी अजित पवार गट सा.न्याय विभागाचे महानगर जिल्हाध्यक्ष जितेंद्र चांगरे यांची उपोषण स्थळी भेट.
सफाई कामगारांच्या संदर्भात राज्य सरकारशी झालेल्या चर्चेतून एकही प्रश्न मार्गी न लागल्याने अखील भारतीय सफाई मजदूर कॉंग्रेसच्या वतीने आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. यात जयप्रकाश चांगरे आणि त्यांचे सहकारी सहभागी झाले आहेत. दुपारी राष्ट्रवादीच्या अजित पवार गट सामाजिक न्याय विभागाचे महानगर जिल्हाध्यक्ष जितेंद्र अरुण भाई चांगरे यांनी उपोषण स्थळी भेट दिली यावेळी जितेंद्र चांगरे यांनी अखील भारतीय सफाई मजदूर कॉंग्रेसच्या मांगण्या संदर्भात अजित दादा पवार यांचे स्वीय सहाय्यक अनिलजी ढिकले यांच्याशी फोनवरून संपर्क साधत जयप्रकाश चांगरे यांची चर्चा करून दिली. यावेळी अनिलजी ढिकले यांनी लवकरच अजित दादा पवार यांच्याशी या संदर्भात चर्चा करून योग्य तो मार्ग काढू असे आश्वासन दिले.


Social Plugin