आ.शाह यांच्या प्रयत्नामुळे अल्पसंख्यांक विभागाकडून विविध कामांसाठी पावणेदोन कोटी मंजुर




धुळे राज्यातील अल्पसंख्यांक बहुल नागरिक क्षेत्रात क्षेत्र विकास कार्यक्रम अंतर्गत धुळे शहरातील अल्पसंख्यांक बहुल क्षेत्रात कब्रस्तान व शाळेच्या संरक्षण भिंतीसाठी आ.फारुख शाह यांच्या प्रयत्नाने १ कोटी 75 लक्ष रुपये मंजूर करण्यात आलेले आहे.याबाबत धुळे शहरातील मोगलाई जुने धुळे येथील नागरिकांनी  तसेच नॅशनल उर्दू हायस्कूल च्या मोकळ्या जागेवाला वॉल कंपाऊंड करण्यासाठी शाळेतील प्रमुखांनी निधीची मागणी केलेली होती व प्रभाग क्रमांक 19 मधील बहारे मदिना मस्जिद  येथे पावसाळ्यात पाणी आल्याने मशिजिदी लगत परिसराचे नुकसान होत होते या साठी आ.शाह यांच्याकडे या भागातील नागरिकांनी निवेदन दिले होते की या कामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा याला तात्काळ प्रतिसाद देत आ.फारुख शाह यांनी अल्पसंख्याक विभाग कडे निधीची मागणी केली व धुळे शहरातील मोगलाई कब्रस्तान येथे संरक्षण भिंतीसाठी 50 लाख रुपये ,जुने धुळे कब्रस्तान साठी 25 लाख रुपये ,नॅशनल उर्दू हायस्कूल याच्या मोकळ्या जागेवर संरक्षण भिंतीसाठी 50 लाख रुपये तसेच प्रभाग क्रमांक 19 बहारे मदिना मस्जिद च्या बाजूच्या नाल्याला संरक्षण भिंतीसाठी 50 लाख रुपये आ.फारुख शाह यांच्या प्रयत्नाने मंजूर करण्यात आलेले आहे याचे काम लवकरच सुरू होणार आहे आ.फारुख शाह यांच्या प्रयत्नाने धुळे शहरातीलच वेगवेगळ्या कब्रस्तानसाठी मंदिरासाठी व ग्रामीण भागातील वेगवेगळ्या कब्रस्तानांसाठी करोडो रुपयांच्या निधी यापूर्वी आ.फारुख शाह  यांनी शासनाकडून आणलेला आहे यामुळे आ.फारुख शाह  यांच्याकडे शहरातील नागरिकांच्या अपेक्षा वाढलेले आहेत या कामाच्या मंजुरीमुळे धुळे शहरातील अल्पसंख्याक समाजामध्ये समाधानाचे वातावरण असून नागरिकांनी आ.फारुख शाह  यांचे आभार मानलेले आहेत.