लाकड्या हनुमान परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या धडक कारवाई ३ कोटीचा गांजा जप्त.


पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप ; एसपी कडून पथकाला बक्षीस.







गांजा खरेदी विक्री, लागवडीचे हब बनलेल्या शिरपूर तालुक्यातील  एका गाव शिवारातील  शेतावर एलसीबीच्या  पथकाने छापेमारी करत सुमारे ३ कोटी रुपयांचा गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी शेत मालकाविरुद्ध पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई करणाऱ्या एलसीबीच्या पथकाला पोलीस अधीक्षक  संजय बारकुंड यांनी २० हजार रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे.

शिरपूर तालुक्यातील लाकड्या हनुमान येथे राहणाऱ्या देवा कहारू पावरा याने त्यांच्या शेतात गांजाची बेकायदेशीररित्या लागवड केल्याची माहिती एलसीबी पीआय दत्तात्रय शिंदे यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली. या बातमीची खातरजमा करत पीआय शिंदे यांनी पीएसआय बाळासाहेब सूर्यवंशी आणि एलसीबीच्या पथकाला कारवाईचे आदेश दिले. एलसीबीच्या पथकाने देवा पावरा हा करत असलेल्या शेताचा शोध घेवून  शेतात तूर आणि कापूस या पिकांच्या मध्यभागी गांजाची लागवड केल्याचे आढळून आले . ३ कोटी १० लाख  रुपये किंमतीचा  ६ हजार २ किलो  वजनाची १८६० गांजाची झाडे एलसीबीच्या पथकाने जप्त केली आहे. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी. शेखर,  एसपी संजय बारकुंड,अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, डीवायएसपी  सचिन हिरे, यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पीआय दत्तात्रय शिंदे , एपीआय जयेश खलाणे, पीएसआय बाळासाहेब सूर्यवंशी, सुनील वसावे, पोना पंकज खैरमोडे, महेंद्र सपकाळ,मयूर पाटील, योगेश जगताप, किशोर पाटील, जगदीश सूर्यवंशी, देवेंद्र ठाकूर, राजु गीते, राजु भिसले, स्वप्निल बांगर, प्रकाश अहिरे, यांच्या पथकाने दि १ रोजी ही कारवाई केली. या कारवाईची माहिती आज पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी  त्यांच्या दालनात पत्रकार परिषद घेवून दिली.