धुळे शहरातील बहुचर्चित पाच कंदील आणि दसरा मैदान भागात भव्यदिव्य व्यापारी संकुल उभारण्यात येणार आहे. यासाठीची प्रशासकीय प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे . दसेरा मैदानाची जागा भू माफीयांची घश्यात जाण्यापासून वाचविली असून या कामांमुळे शहराच्या सर्वांगीण विकासात भर पडणार आहे .
यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खा.डॉ.सुभाष भामरे यांच्या सह अन्य नेत्यांनी विशेष सहकार्य केले.अशी माहिती भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी परेश अग्रवाल, तुकाराम चौधरी, राकेश संचेती, अँड. प्रवीण परदेशी, भाजपाचे सरचिटणीस संदीप बैसाणे, पृथ्वीराज पाटील, भाजयुमो जिल्हाध्यक्ष आकाश परदेशी, पवन जाजू, प्रकाश उबाळे, तसेच पत्रकार संघाचे उपाध्यक्ष मनोज गर्दे , कोषाध्यक्ष अतुल पाटील,सचिव सचिन बागुल आदी उपस्थित होते.
धुळे शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून विविध निर्णय घेण्यात आले असून यांची अंमलबजावणी युद्ध पातळीवर करण्यात येईल. अशी माहिती भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी दिली.
धुळे शहरातील दसेरा मैदानाची मनपाची जागा भूमाफियांकडून हडप करण्यात आलेली होती. हे कळताच या जागेबाबत प्रशासनाकडे चौकशी करण्यात आली असता ही जागा भूमाफियांनी मूळ मालकाच्या नावावर करून घेतली होती. संबंधित अधिकाऱ्याकडे जागेची फाईल मागितली असता अधिकाऱ्यांकडून फाईल देण्यास टाळाटाळ झाली. भूमाफियांनी ही फाईल महापालिकेतून गायब केली होती. कुठलेही प्रकारचे आरक्षण टाकायचे झाल्यास या संदर्भात कागदपत्र असलेली फाईलही जिल्हाधिकारी कार्यालयात असते. परंतु अशी फाईल देखील भूमाफियांनी गायब केली होती. अखेर संबंधित जागे संदर्भातील विषय महापालिकेच्या मालकीचा असून शहराच्या विकासाशी संबंधित आहे.यात काही गफलत केली तर दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येईल. असा इशारा देण्यात आला. यांनतर संबंधित अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली आणि त्यांनी ५० वर्ष पूर्वीचे जुने रेकॉर्ड तपासणी केली.जागेची नवी फाईल तयार करण्यात आली.जागेची फाईल सिटीसर्वे कार्यालयात तत्कालीन उपनिबंधक पंकज पवार यांच्याकडे सोपविण्यात आली. जागेच्या उताऱ्यावर महापालिकेचे नाव नोंदण्यासाठी जमा करण्यात आलेल्या या फैलावर नाव लावण्यास १५ दिवस लागले .ही टाळाटाळ जाणीवपूर्वक करण्यात आली होती. प्रशासकीय दिरंगाईची माहिती खा.डॉ.सुभाष भामरे यांना देण्यात आली होती. यामुळे पवार यांना खा.डॉ.सुभाष भामरे यांच्या कार्यालयात प्रत्यक्ष बोलवण्यात आले व शहराच्या विकासाच्या दृष्टीने या जागेचा विषय अत्यंत महत्वाचा असून जागेच्या उताऱ्यावर लावलेली बेकायदेशीर नावे वगळून नियमाप्रमाणे धुळे महापालिकेचे नाव लावावे अशी सूचना खा.भामरे यांनी पवार यांना केली. यानंतर साधारणपणे आठवडाभरात उताऱ्यावर महापालिकेचे नाव लागले आणि धुळे महानगरपालिका धुळे असे नाव असलेला नवा उतारा धुळे महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे सुपूर्त करण्यात आला.या प्रक्रियेत खा.डॉ. सुभाष भामरे यांचा सिंहाचा वाटा आहे.

Social Plugin