तेलंगणा ,पंजाब ,हरियाणा या तिन्ही राज्यात वेगवेगळ्या पक्षाचे सरकार असूनही शेतकऱ्यांना पाणी व वीज दिवसा दिले जाते. महाराष्ट्रात का नाही? असा प्रश्न उपस्थित करीत शेतकऱ्यांना रात्री बेरात्री हिंस्र प्राणी, बिबट्या, सर्प,इतर पशु प्राणी पासून जीव वाचविण्यासाठी दिवसा वीज पुरवठा मिळाला पाहिजे या मागणीसाठी भारत राष्ट्र समिती, धुळे जिल्हा तर्फे अधीक्षक अभियंता महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. याविषयी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात भारत राष्ट्र समिती म्हटल आहे की, शेतकऱ्यांना रात्री बेरात्री शेतात गहू, हरभरा इतर पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागते . देशात महाराष्ट्र राज्य नंबर १ आहे असा डाव राजकीय मंडळी आणतात. पण प्रत्यक्षात तेलंगणा, हरियाणा पंजाब यांच्यापेक्षाही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची दयनीय, शोषित अवस्था झालेली आहे. या तिन्ही राज्यात वेगवेगळ्या पक्षाचे सरकार असूनही तेथील सरकारने शेतकऱ्यांना वीज , पाणी या सुविधा देऊन तेथील राज्यांचा जी.डी. पी वाढविला आहे. शेतकऱ्यांची या राज्यांमध्ये आत्महत्या नसून देशात शेतीमध्ये प्रगतीपथावर काम आहे.भारतीय कायदे इंग्रजांनी भारतीय लोकांवर राज्य करण्याच्या हेतूने बनविले होते. जेणेकरून सरकारचा वचक,जरब, धाक जनतेवर असावा लोकशाहीत विकासाची धोरणे, कायदा राबविण्यासाठी भारतात दिल्ली मध्ये संसद व महाराष्ट्र राज्यात विधान सभा अस्तित्वात आहे. यात बुद्धिमान, ज्ञानी, नीतिमान, अभ्यासू, कार्यक्षम व्यक्तिमत्व सदस्य म्हणून पाठवितो. या मंडळींनी लोकहिताची, देश हिताची व कृषी प्रधान देशात शेतकऱ्यांसाठी कायदे व धोरण आखून न्याय मिळवून दिला पाहिजे .पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांसाठी तसे होताना दिसत नाही. उद्योजक , व्यापारी साम्राज्यवादी व भांडवलशाही धाजिर्न , त्यांच्यासाठी कायदे बनविले जात आहेत. लोकशाही देशात अन्न,वस्त्र , निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा मानल्या जातात.या गरजा भागवून सुखी व आनंदीदायी जीवन जगायचे तर त्यासाठी प्रत्यक क्षेत्राला विजेचा वापरही अपरिहार्य बाब आहे. केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने नुकत्याच नियंत्रण नियमावली २०१० आणि २०११ या संपूर्ण देशासाठी जारी केल्या आहेत. तरीही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कायदा व धोरण राबविताना दुजाभावाची वागणूक देत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा पाहिजे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या आंदोलनात ईश्वर उखा पाटील,नाना पाटील , पुंजू पाटील, जगदीश पावरा, प्रवीण पावरा इत्यादी कार्यकर्ते सहभागी झाले होते

Social Plugin