तृतीयपंथी हक्क अधिकार संघर्ष समितीच्या आमरण उपोषणाला परिवर्तन ग्रुपचा जाहीर पाठिंबा.

 


आरक्षणासह विविध मागण्यांसाठी तृतीयपंथी हक्क अधिकार संघर्ष समितीच्या जिल्हा समन्वयक शमिभा पाटील यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरूवात करण्यात आली आहे. या उपोषणास परिवर्तन ग्रुपतर्फे जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे यावेळी परिवर्तन ग्रुपचे अध्यक्ष सतीश गायकवाड जितेंद्र केदार दीपक सोनवणे डिंगबर सोनवणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.