मुस्लिम मनीयार बिरादरीचा स्तुत्य उपक्रम- भाऊबीज निमित्ताने ५१ महिला भगिनींना साडी भेट.

 



मुस्लिम मनीयार बिरादरीतर्फे नेहमीच समाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात, त्यात गोर गरिबांना मदत करणे, प्रभोधनात्मक कार्यक्रम राबविणे, शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांनां योग्य ते मार्गदर्शन करणे,  अशी अनेक  स्तुत्य उपक्रम  राबविण्यात येत असतात. असाच एक उपक्रम मुस्लिम मनीयार बिरादरीतर्फे काल राबविण्यात आला. निमित्त होते भाऊबीजेचे काल भाऊबीज निमित्ताने ५१ महिला भगिनींना साडी व १०१ रुपये भेट म्हणून देण्यात आले. मुस्लिम  बिरादारीच्या रथ चौक येथील कार्यालयात समाजातील उपेक्षित ५१ महिलां भगिनींना साडी व १०१ रुपये भेट म्हणून देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी समाजात उपेक्षित असलेल्या महिला भगिनी त्यात खास करून दुर्धर आजारातील महिला, साफसफाई कर्मचारी, कचरा वेचणाऱ्या भगिनी व भिक्षुक अशा ५१ महिला भगिनींना साडी व १०१ रुपये भेट म्हणून देण्यात आली.  यावेळी मनीयार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख, सय्यद चांद, अब्दुल रऊफ रहीम, अल्ताफ शेख, मोहसीन युसुफ, अख्तर शेख ,जुलकर नैन, ताहेर शेख आदीं उपस्थित होते.