नवीन मतदार नोंदणी मधील व्यत्यय त्वरित दूर करा - डेमोक्रेटिक फोरम ची मागणी




महाराष्ट्र डेमोक्रॅटिक फोरम च्या जळगाव शाखेतर्फे तहसीलदार जळगाव यांना प्रत्यक्ष भेटून १६ सप्टेंबर पासून सुरू असलेल्या व १० डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या मतदार नोंदणी मधील ऑनलाईन व ऑफलाइन मध्ये येत असलेला व्यत्यय  व इतर अडचणी बाबत तहसीलदार विजय बनसोडे यांची राज्य फोरमचे समन्वयक फारूक शेख व जिल्हा समन्वयक आरिफ देशमुख यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने भेट घेऊन ७ अडचणी बाबत चर्चा केली. त्यात ऑफलाइन मध्ये  मशीन नाव एक्सेप्ट करीत नाही, १६ सप्टेंबर पूर्वीची मतदार कार्ड अद्याप मिळालेले नाही,काही मतदार कार्ड क्यूरीमुळे रिजेक्ट झाले असले तरी मतदारांना फीडबॅक मिळालेला नाही, जळगाव शहरातील चार पोलिंग बूथ कमी करण्यात आल्याने अनुक्रमांक बदल झाला त्यामुळे नावे डिलीट झालेली आहे, १६ सप्टेंबर पासून जी नावे नोंदविण्यात येत आहे ती ननोंदवल्यामुळे त्यात काही क्वेरी निघाल्यास तो अर्ज रिजेक्ट होईल त्याची पूर्तता दहा डिसेंबर पर्यंत न झाल्या मतदार हा मतदानापासून वंचित राहील अशा प्रकारच्या मागण्यांवर तहसीलदारांची चर्चा केली असता त्यांनी यासर्व अडचणी असल्या तरी प्रशासन वेळीच तोडगा काढण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आश्वासन दिले व मनुष्यबळ कमी असल्याची बाब  सुद्धा मान्य केली.मनुष्यबळा अभावी मतदार चे नाव मतदार यादीत समाविष्ट होणार नाही याची दक्षता घेण्याची जबाबदारी सुद्धा तहसीलदार यांनी घेतलेली आहे.

यावेळी महाराष्ट्र राज्य निमंत्रक फारुक शेख, जिल्हा निमंत्रक आरीफ देशमुख, मुश्ताक अहमद,अन्वर खान, मझहर खान,मतीन पटेल, कासीम उमर, रज्जाक पटेल, अरमान पटेल,अब्दुल रऊफ टेलर, अल्ताफ शेख आदींची उपस्थिती होती.